साहित्यिक परिचय
– श्वेता कुलकर्णी
पुरस्कार व सन्मान
श्वेता कुलकर्णी या समकालीन मराठी साहित्यातील एक सकस आणि संवेदनशील लेखिका आहेत. आजपर्यंत त्यांच्या दहा कादंबऱ्या आणि दहा कथासंग्रह प्रकाशित झाले असून, त्यांनी लेखनाच्या माध्यमातून मानवी भावना, नातेसंबंध, समाजातील वास्तव आणि स्त्रीमनाचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले आहेत.
त्यांच्या शंभरहून अधिक कथा विविध मासिके, नियतकालिके आणि वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झाल्या आहेत. सध्या त्या वारजे (पुणे) येथे वास्तव्यास आहेत.
त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांना अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, त्यापैकी प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे —
अक्कलकोट भूषण कविरत्न पुरस्कार – २०१३
काव्यशिल्प राज्यस्तरीय काव्यस्पर्धा – तृतीय क्रमांक (२०१३)
साहित्यप्रेमी भगिनी मंडळ राज्यस्तरीय कथास्पर्धा
द्वितीय क्रमांक – २०१३
प्रथम क्रमांक – २०१५
ग्रंथसंवाद राज्यस्तरीय कथास्पर्धा – द्वितीय क्रमांक
साहित्य संस्कृती मंच कथास्पर्धा – प्रथम क्रमांक
ललना मासिक कथास्पर्धा (२००९ ते २०१७) – सातत्याने यश
सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना) – कथास्पर्धा प्रथम क्रमांक
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड – कथास्पर्धा द्वितीय पुरस्कार (२०१७)
पुणे महानगरपालिका आयोजित ‘वारजेकट्टा’ कथास्पर्धा – दोन वेळा उत्तेजनार्थ पारितोषिक
किताबघर वाचनालय, पुणे – काव्यस्पर्धा द्वितीय पारितोषिक
सुखायन कथास्पर्धा – द्वितीय क्रमांक (२०२२)
नवोदित साहित्य मंच व यूथ फाउंडेशन, दिल्ली तर्फे
मराठी साहित्यातील योगदानासाठी ‘जगन्नाथदास रत्नाकर सन्मान पुरस्कार’समांतर भाग्य, बडोदा राज्यस्तरीय कथास्पर्धा – प्रथम क्रमांक
गुंफण साहित्य अकादमी – गुंफण गुणगौरव पुरस्कार
साहित्यसेवा प्रज्ञा मंच, कल्याण – साहित्य उपासक पुरस्कार
त्यांच्या कथा व कवितांचे अभिवाचन सातारा आकाशवाणी केंद्र आणि पुणे आकाशवाणी केंद्र येथे प्रसारित झाले आहे.
Testimonials
